गोंदीया जिल्हात एसटीच्या ८२ फेऱ्या वाढविल्या: शाळांसाठी जास्त फेऱ्यांचे नियोजन
गोंदिया 12: राज्यातील कोरोना परिस्थिती आता नियंत्रणात आली असल्याने शासनाकडून निर्बंध शिथिल होत आहेत. हळुहळु सर्व सेवा सुरु करून विस्कटलेली घडी परत बसविण्याची तयारी होत आहे.
सुमारे दीड वर्ष बंद असलेले शाळा- महाविद्यालय राज्यात ४ ऑक्टोबरपासून सुरु झाले आहेत. त्यात आता दिवाळी तोंडावर असून वर्षातील सर्वात मोठा सण असल्याने प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी किंवा नातेवाईकांकडे जाण्याच्या तयारीत असतात. यासाठी आता रेल्वे व एसटीही सुरु झाल्या आहेत. हे बघता आता कोरोनामुळे नुकसानीत गेलेल्या राज्य रस्ते परिवहन महामंडळाला थोडा दिलासादायक वातावरण तयार होत आहे. यातूनच आगारांनी बसेसच्या ८२ फेऱ्या वाढविल्या आहेत. महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होणार या दृष्टीने हा काळ अतिमहत्त्वाचा ठरणार आहे.