जनावरांना कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या १३ जणांना अटक : ७६ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली : स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे सापळा रचुन जनावरांना कत्तलीसाठी घेवून १३ जणांना अटक केल्याची कारावाई काल ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली. आरोपींकडून गोवंश आणि वाहने असा ७६ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शेख खदिर शेख चॉद (२६), शेख नबी शेख गणी (२५), शेख इजाज शेख अझम (३५) तिघेही रा. तेलंगणा, ख्वाजा मयनुद्दिन नजीर साब सय्यद (३८) रा.उदगीर जि. लातुर, जिलानी मेहबुब शेख (३३) रा.मरकागोंदी जि. चंद्रपूर, अजहर उद्दिन गौसुद्दिन सय्यद (२६) रा. भाईपटार जि.चंद्रपूर, युनुस गफफार सय्यद (३०) रा. गोयगाव जि.आसीफाबाद, अनिल शंकर सुर्वे (४०) रा. गणेशपुर जि.वाशीम, शेख इक्बाल शेख नुरू (२२) रा.मुर्तीजापूर जि. अकोला, मोहम्मद सुफियान मो.नसरी (१९) रा.खडकपुरा जि. अकोला, अब्दुल गफफार अब्दुल गुलाब (२६) रा.मुर्तीजापूर जि.अकोला, नासीर वाहाब शेख (२२) रा.पठाणपुरा जि.अकोला, गणेश हरी पप्लवाड (२१) रा.गडचांदूर जि.चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. अरोपींविरूध्द कलम ११(१) ड प्राण्यांना निर्दयतने वागणुक प्रति.अधि.५ (अ) १,९० महा.प्राणी संरक्षण अधि अंतर्गत गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड, तेलंगण आंरराज्यातील काही मोठे व्यापारी हे गडचिरोली जिल्हयातील तसेच सिमावर्ती भागातील छत्तीसड राज्यातील स्थानिक शेतकऱ्यांकडील गुरे कत्तलीकरीता खरेदी करून मालवाहु वाहनांमध्ये अपुऱ्या जागेत जबरजस्तीने कोंबुन दाटीवाटीने व निर्दयतेने वाहणात लोड करून रात्रो दरम्यान कसनसुर, जारावंडी, कारवाफा,चातगाव, गडचिरोली मार्गे बेकायदेशिर वाहतुक करून हैद्राबाद, तेलंगणा राज्यात पोहचता करीत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली असता मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गडचिरोली नजीकच्या मुरखळा येथे सापळा रचला असता. यावेळी ४ आयशयर मालवाहु ट्रक तसेच ३ महिंद्रा बोलेरो पिकअप असे ७ वाहने गडचिरोली शहराकडून चंद्रपूर कडे भरधाव वेगाने येत असल्याचे दिसले. सदर वाहनांना थांबवून वाहनांची झडती घेतली असता वाहनात ११९ गोवंश, रेडे निर्दयीपणे कोंबुन असल्याचे निदर्शनास आले. सुरक्षीततेच्या दृष्टीने त्यांना लवकरात लवकर मालवाहु वाहनामधून मोकळे करणे आवश्यक असल्याने सदर मालवाहु वाहने अरोपींसह हळदा ता.ब्रम्हपूरी जि. चंद्रपूर येथील गोंविद गोशाळेत पोहचून सर्व जनावरांना मोकळे करण्यात आले. त्यांनत ४ मालवाहु ट्रक व ३ बोलेरो पिकअप वाहने जप्त करण्यात आली. यात १३ लाख ८६ हजारांचे जनावरे, ६३ लाख ५ हजार रूपये किंमतीचे वाहने आणि १० मोबाईल असा एकुण ७६ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर करवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गौरव गावंडे, भाऊराव बोरकर, सत्यम लोहंबरेख् निलकंठ पेंदाम, संजय चक्कावार, दिनेश कुथे, शुक्राचारी गवई, सुनिल पुट्टावर, मंगेश राऊत, नुतेश धुर्वे, मानीक निसार, शेषराव नैताम यांनी केली.