गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा तडकाफडकी राजीनामा : राजकीय वर्तुळात खळबळ

गांधीनगर : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. भाजप नेते विजय रुपानी यांच्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय रुपानी यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे.
विजय रुपानी गुजरातमधील राजकोट पश्चिम विधानसभेचे आमदार असून त्यांनी २०१६ साली मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आनंदीबेन पटेल यांच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांची सूत्र स्वीकारली होती. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते असणारे रुपानी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यानंतर १९७१ साली जनसंघात प्रवेश केला होता. यापूर्वी ते गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. मात्र मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही स्वाभाविक प्रक्रिया असल्याची प्रतिक्रिया रुपानी यांनी दिली आहे.

Share