छत्तीसगढमध्ये 5 वॉन्टेड नक्षलवाद्यांना अटक

रायपूर 09– छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यामधील विविध ठिकाणांवरून 5 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यामधील तिघेजण जल प्रक्रिया प्रकल्पाच्या साहित्याला आग लावण्यामध्ये सहभागी झालेले होते, असे पोलिसांनी सांगितले.

यातील तिघांना नायमेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कादेर आणि जापेली गावांदरम्यानच्या जंगलातून पकडण्यात आले. तर अन्य दोघांना मिरतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मंदर गावाजवळच्या जंगलातून ताब्यात घेण्यात आले.

हे तिघे जल प्रकल्पाच्या साहित्याच्या जाळपोळीमध्ये सहभागी होते. केंद्रीय राखीव पोलीस दल, जिल्हा राखीव दल आणि जिल्हा पोलीस दल बुधवारी झालेल्या या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. अटक करण्यात आलेल्यांमधील काडती हा नक्षलवादी 2008 मध्ये तालनार गावच्या सरपंचाच्या हत्येमध्येही सहभागी होता. त्या प्रकरणात वॉन्टेड होता.

Share