धक्कादायक! जिल्हात ३६७१ बालके कुपोषित, तीव्र कुपोषणात देवरी तालुका अग्रस्थानी
५४४ बालकात कुपोषणाचे प्रमाण तीव्र
गोंदिया 03: गेल्या दोन दशकांपासून केंद्र व राज्य सरकार कुपोषण निर्मूलनाच्या उद्देशाने विविध अभियान , उपक्रम राबवित आहे. मात्र बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण काही कमी दिसत नाही. यामुळे कुपोषित बालकांच्या भविष्याचा प्रश्न कायम राहिला आहे. गोंदिया जिल्हात ऑगस्ट महिन्यामध्ये करण्यात आलेल्या तपासणीत १ लाख ७६ बालकांपैकी ३ हजार ६७१ बालके कुपोषित आढळले आहेत. यामध्ये ३१२७ माध्यम तर ५४४ बालके तीव्र कुपोषित आहेत.
यात देवरी तालुका जिल्हात अग्रस्थानी आहे. देवरी तालुक्यात एकूण ८६ बालके तीव्र कुपोषित आहेत तर गोंदिया तालुक्यात भाग- १ मध्ये ७६, भाग- २ मध्ये ७७, अर्जुनी मोरगाव तालुक्यात ८१, सालेकसा ४७, सडक अर्जुनी ३७, आमगाव ३४, तिरोडा ५८ व गोरेगाव ४८ बालके आहेत.