अनिल पाटील यांनी जि.प.सीईओ पदाचा स्विकारला पदभार
गोंदिया: अनिल पाटील यांनी 2 सप्टेंबर (मध्यानानंतर) रोजी गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला.
श्री अनिल पाटील यांचे शिक्षण एम.एस.सी. (ॲग्री.) (सुवर्ण पदक),एल.एल.बी. आहेत. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा अधिकारी वर्ग-2 म्हणून 1989 ते 1996 पर्यंत विविध पदांवर कामकाज केले. 1996 पासून महसूल विभागात परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू. परिविक्षाधीन कालावधीनंतर ऑगस्ट 1998 ते जुलै 1999 पर्यंत सिंधुदूर्ग येथे जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत. जुलै 1999 ते मे 2003 पर्यंत अलिबाग येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत. मे 2003 ते जुलै 2008 पर्यंत उपजिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी म्हणून नागरी जमीन कमाल धारणा (मुंबई) कार्यालयात कार्यरत. मार्च 2008 ते मे 2011 पर्यंत मुंबई येथे उपनियंत्रक शिधावाटप पदावर कार्यरत. यावेळी शिधापत्रिका नमुने ऑनलाईन उपलब्ध करुन लोकांना होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला. सप्टेंबर 2011 ते जुलै 2016 पर्यंत सिडको महामंडळात प्रतिनियुक्ती.
यावेळी नवी मुंबई व सिडको मालकीचे अतिक्रमीत भूखंडावरील अतिक्रमणे निष्कासनाचे कामकाज व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादीत करावयाच्या जमिनीची
भूधारकांच्या संमतीने भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केली. जुलै 2016 पासून पदोन्नतीवर अप्पर जिल्हाधिकारी नंदूरबार या पदावर जानेवारी 2018 पर्यंत कामकाज. जानेवारी 2018 पासून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई तसेच व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मुंबई येथे 30 ऑगस्ट पर्यंत कामकाज.