समता सैनिक दलाची तालुका स्तरीय सहविचार सभा संपन्न

देवरी 29: येथील आफताफ मंगल कार्यालय येथे समता सैनिक दलाची तालुकास्तरीय सहविचासभा आयोजित करण्यात आली या प्रसंगी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दादा साहेब कोचे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.गाजेन्द्रजी गजभिये , राष्ट्रीय स्टाफ आफिसार मुख्य अथिती मिथुन मेश्राम माजी जि.ओ.सी. विद्याभा समता सैनिक दल सदस्य, सौ. रत्नमाला कुटारे भंडारा तालुका प्रमुख श्रीराम जि बोरकर भंडारा नगर प्रमुख मा. विलास नागदेवे आणि जिल्हा ट्रेनिंग कमांडर आकाश ठवरे त्याचप्रमाणे देवरी तालुक्यातील बहुसंख्य गावातून शाखांचे पदाधिकारी जवड पास ३०० सैनिकांनी हजेरी लावली.

या सभेमध्ये कोरोना महामारी मध्ये स्मृती शेष झालेल्या स.स.द. च्या पदाधिकारी आणि सैनिकांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. देवरी येथील पोस्ट मास्टर हंसराज मेश्राम तसेच अरविंद गोपाल राउत टोयागोंडी यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली . तालुका स्तरीय समता सैनिक दलाच्या कार्यकारणी मध्ये विस्तार करून नवीन सैनिकांना संधी देण्यात आली. त्यामध्ये सौ. सिमा सिद्धार्थ साखरे देवरी सर्कल प्रमुख, ललिता सुरेंद्र वाघमारे स्टाफ ऑफिसर सौ उषाताई विठ्ठल साखरे चिचगड सर्कल प्रमुख तसेच कौतुका देवचंद पटले मुल्ला सौ मंजुषा विजय वासनिक गोटाबोडी सर्कल , मनोज शंकर वैद्य देवरी, केशव बाबुराव वैद्य देवरी, सौ बागडे मुल्ला अशा चार सर्कल मध्ये विभाजन करण्यात आले व सर्कल प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमाचे अधक्ष्य व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अधक्ष दादासाहेब कोचे यांनी आपले मार्मिक विचार प्रगठीत करून येणाऱ्या १५ सप्टेंबर ला स्मृती शेष शालिनी ताई कोचे यांच्या प्रथम स्मृतीशेस कार्यक्रमाच्या अनुसंधाने सर्व अधिकारी व सैनिकांना भंडारा येथे हजार राहण्याचे निमंत्रण दिले. विशेष म्हणजे समता सैनिक दलाचे भवन उभारणी साठी भंडारा येथे मुख्य हायवे रोड लागून 1 एकर जमीन दाण करण्याचे जाहीर केले व देवरी येथील माझी नगरसेवक आणि अन्नुभाई शेख यांच्या त्यांच्या समाज कार्यातील उत्कृष्ट सहभागाबद्दल त्यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन समता सैनिक दल पदाधिकारी व सैनिक मिळून सत्कार करण्यात आला या प्रसंगी तालुक्यातील सैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.

ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनोज कुमार बोले तालुका प्रमुख यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता ललितकुमार भैसारे , मदनलाल लाई , वंदना राउल , मनोज वैध रेवत राऊत तारा शहारे इलाम्कर लाई यशवंत खोब्रागडे मोसुल्दास राऊत, मंजुषा वासनिक ,प्रतिमा देशपांडे यांनी परिश्रम घेतले व भीम स्मृतीने व समापन वंदनेने कार्यक्रमाचे सांगता झाली.

Print Friendly, PDF & Email
Share