?सावधान.. अल्प पावसाने गोंदिया जिल्हात जलसंकट? शिरपूर धरण आटले !

◾️मध्यम प्रकल्प देखिल तहानलेलेच सिरपुर धरणात फक्त 21.50 % पाणी शिल्लक

प्रा. डॉ. सुजित टेटे

गोंदिया 27- जिल्हात अल्प स्वरूपाचे पाऊस पडल्यामुळे जिल्हातील जलाशय अर्ध्यापेक्षा कमी भरलेले असल्याची माहिती समोर आलेली आहे. ऑगस्ट महिन्यापासून पावसाचा जोर कमी होत जातो आणि जलाशयातील जलसाठा हा अर्ध्यापेक्षा कमी असल्याने जिल्हात जलसंकट निर्माण होणार का ? असा प्रश उभा झाला आहे. जुलै च्या मध्यात पावसाने गोंदिया जिल्हात दांडी मारल्याने शेतकरी वर्गाला पाण्याची चिंता सतावत आहे . भविष्यात जिल्हात जलसंकटला सामना करावा लागू शकतो त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकर्‍यांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

बाघ इटीयाडोह सिंचन विभाग गोंदिया द्वारा प्राप्त माहिती नुसार जिल्हातील सर्वात मोठे जलाशयामध्ये सिरपुर , कालीसरार , पुजारीटोला हे जलाशय येतात हेच जलाशय जिल्हावाशीयांसाठी जीवनवाहिनी चे काम करीत असून पिण्यासाठी , शेतीसाठी आणि प्राण्यांसाठी येथील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. परंतु जलाशयातील जलसाठा अर्ध्या पेक्षा कमी असल्यामुळे जलसंकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाण्याचा वापर सांभाळून करा

जिल्हात अल्प प्रमाणात पाऊस पडल्यामुळे जलाशयातील जलसाठा कमी आहे. या जलाशयातून शेती , पेयजल आणि गोंदिया नगर परिषद साठी पाणी आरक्षित केले जाते. नागरिकांना आवाहन आहे कि पाण्याचा जपून वापर करावा. पाण्याचा दुरुपयोग टाळावा.

आर. जी. कुरंजीकर , कार्यकारी अभियंता , बाघ इटियाडोह सिंचन विभाग गोंदिया

26 ऑगस्ट च्या प्राप्त माहिती नुसार देवरी येथील सिरपुर धरणात फक्त 21.50% पाणी शिल्लक असून कालीसरार- 27.99, पुजारी टोला – 49.40 पाणी संग्रहीत आहे. त्यामुळे जिल्हावशीयांसाठी ही धोक्याची घंटा आहे.

मागील वर्षी याच कालावधी मध्ये सिरपुर धरणात 75 %, काली सरार -75, पुजारी टोला -85.04 % इतका जलसाठा होता. वरील आकडेवारी नुसार स्पष्ट चित्र आहे की जिल्हात अर्ध्यापेक्षा कमी जलसाठा असून येणार काळ चिंतेचा आहे.

Share