खंडणी : पोलिस उपायुक्तांसह 2 पोलिस निरीक्षकांवर खंडणीचा गुन्हा

वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील तीन पोलीस अधिकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक आणि खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून खबऱ्यांकडून 17 लाख रुपयांची खंडणी पोलीस अधिकांऱ्यांनी उकळल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त (DCP) आणि दोन पोलीस निरीक्षकांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपायुक्त अकबर पठाण ,पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव , सुनिल माने यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रॉपर्टी डीलर गुरुशरणसिंग चौव्हान यांनी अंबोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत अंधेरी प. येथील इन्फिनिटी मॉलच्या समोर घडला आहे.

तक्रारदार गुरुशरणसिंग चौव्हान हे प्रॉपर्टी डिलर असून त्यांच्याकडे पोलीस अधिकारी यांनी वारंवार पैशांची मागणी करत होते. तक्रारदार यांनी पैसे न दिल्याने त्याला एका गुन्ह्यात गोवत एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला, असा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. हा गुन्हा पुढे तपासासाठी गुन्हे शाखा 10 कडे वर्ग केला होता. इतक्यावरच न थांबता पोलिसांनी हाताने मारहाण करत कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. या तक्रारीवरुन अंबोली पोलीस
ठाण्यात पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव, सुनिल माने यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्यावर यापूर्वीही खंडणीचा गुन्हा दाखल असून या
गुन्ह्यातील एक पोलीस निरीक्षक अटकेत आहे. या पोलीस निरीक्षकाला पोलीस दलातून बडतर्फ
करण्यात आले. तर तिसरा आरोपी हा सध्या पोलीस दलात कार्यरत आहे.

Share