अत्याधुनिक अग्निशमन वाहन देवरी नगरपंचायतीत सज्ज, तालुक्याला मिळणार सेवा

◾️आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते अग्निशमन वाहनाचे स्वागत

देवरी 26: महामार्गावर असलेल्या देवरी शहराला मोठ्या अग्निशमन गाडीची गरज होती te स्वप्न आज पूर्ण झाले असून जिल्हानियोजन (डीपीटीसी) च्या फंडातुन देवरी नगरपंचायतला 4500 लिटर क्षमता असलेल्या अत्याधुनिक अग्निशमक गाडी उपलब्ध झाली असून नगरपंचाययतीच्या प्रांगणात नवीन गाडीचे फित कापून आमदार कोरोटेच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेले आहे.

सदर अग्निशमन गाडीचा तालुक्याला फायदा मिळणार असून शहरातील असेच तालुक्यातील आपातकालीन परिस्थितीमध्ये जीवितहानी आणि वित्तहानी टाळण्यासाठी तसेच कमीवेळात आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपयोग नक्कीच उपयोग होणार त्यामुळे परिसरातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण बघावयास मिळाले.

अपघात आणि आपातकालीन परिस्थितीत सदर वाहनाचे तालुक्यातील 20 KM पर्यंत सेवा पुरविली जाणार त्यासंबंधीचा आपातकालीन संपर्क हेल्पलाईन क्रमांक लवकरचं जाहीर होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

सदर कार्यक्रमात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे, देवरी नगरंचायतचे मुख्याधिकारी व नगरपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Share