गोंदियाच्या अतिदुर्गम तालुका समजल्या जाणाऱ्या देवरी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी केले मोबाईल वापस आंदोलन

देवरी 25: एकात्मिक बाल विकास विभागा मार्फत अंगणवाड्या चालविल्या जात असून अंगणवाड्यांची तसेच विद्यार्थ्यांची योग्य माहिती . शाशना ला पुरविण्यात यावी या साठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले होते .तर या मोबाईल मध्ये चालणार स्पॉफ्टवेयर हा इंग्रजी भाषेत असल्याने बऱ्याच अंगणवाडी सेविकांना ते भरणे देखील जमत नाही . तर मोबाईल ची रॅम देखील कमी असल्याने हा मोबाईल व्यवस्थित चालत नसून माहिती भरायला अडचण होत असल्याने तसेच उशिरा माहिती अंगणवाडी सेविका देत असल्याने अंगणवाडी सेविकांचे पगार देखील कापले जात असून . आधीच अल्प पगारात काम करीत परवडत नसल्याने.शाशनाने हे मराठी किंवा हिंदी भाषेचं चालणारे सॉफ्ट वेयर टाकून तसेच रॅम वाढवून नवीन मोबाईल द्यावे अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी करीत त्यांच्या जवळ असलेले जुने मोबाईल आज एकात्मिक बाल विकास कार्यलयाला परत करीत हे आंदोलन केले आहे.

Share