पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्राचे महापुरुष होते– जी.जी.तोडसाम (तालुका कृषिअधिकारी देवरी)

देवरी 23:
भारत देश हा दिडशे वर्षाच्या पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर आधुनिकीकरणास सुरुवात झाली. स्वातंत्र्य चळवळीत असंख्य देशभक्त महापुरुष होऊन गेले.त्यामध्ये पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यानी आधुनिक महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.त्यामुळे हे महाराष्ट्राचे फार मोठे महापुरुष होते असे प्रतिपादन देवरीचे तालुका कृषिअधिकारी जी.जी.तोडसाम यानी केले आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती निमित्त बोलत होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक चिचगडचे मंडळ कृषिअधिकारी चंद्रकांत कोळी,देवरीचे मंडळ कृषिअधिकारी विकास कुंभारे यांची कार्यक्रमास प्रमुख होती. उपस्थिती डॉ. विखे पाटील यानी १९४९ साली सहकारी तत्वावरील आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करुन कृषिक्षेत्र व सहकार चळवळीमध्ये मोठा इतिहास घडवला. त्यामुळे आज ऊसाची व्यापारी तत्वावर लागवड सुरु झाली. त्या जोरावर आज महाराष्ट्रात १६५ सहकारी साखर कारखाने उदयास आले.त्यामुळे महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी कामगार यांची अर्थव्यवस्था सुधारलेली आहे.अशा या महापुरुषांचे भरीव कार्याचे स्मरण होऊन आधुनिक तरुण शेतकरी बांधवांना स्पूर्ती निर्माण झाल्याशिवाय रहाणार नाही. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी नारळी पौर्णिमा या त्यांच्या जन्मदिनानिमित्त शासकीय कार्यालयात जयंती साजरी करण्यात येत आहे.सदर कार्यक्रमात तालुक्यातील शेतकरी, क्षेत्रिय अधिकारी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृषिपर्यवेक्षक एम. एम. एम एम यानी तर आभारप्रदर्शन कृषिसहाय्यक राजेश भोयर यानी मानले.

Share