विनावर्दी कारवाई करणाऱ्या पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश!

मुंबई 13: राज्यातील पोलिसांना कारवाई करताना पोलीस कर्मचाऱ्यांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना यापुढे वर्दीत राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. वर्दीवर नसताना कोणतीही कारवाई करु नये असं, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आदेश दिले आहे.

हा निर्णय राज्यातील वाहतूक पोलिसांना सुध्दा लागू असणार आहे. वाहतूक पोलिसांना वर्दीवर नसताना कोणत्याही गाड्या अडवता येणार नाहीत. काही वेळा पोलीस वर्दीवर नसताना लोकांवर कारवाई करतात. वर्दीवर नसताना तोतया पोलीस अधिकारी अशावेळी फायदा घेवू शकतात. त्यामुळे वर्दीतच पोलिसांनी कारवाई करावी असे आदेश मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.

हेमंत नगराळे हे 1997 च्या बॅचचे आयपीस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांच्या सेवेचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यांनी नवी मुंबई, नागपूर या ठिकाणी सेवा केली आहे. मार्च 2021 मध्ये परमबीर सिंग यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Share