आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राच्या विकासा करीता निधि दया.

देवरी १३: आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राच्या विविध प्रकारच्या विकास कामाकरिता कोरोना संसर्गामुळे उद्भभवलेल्या राज्याच्या तांत्रिक कारनामुळे दोन वर्षापासून आवश्यकतेनुसार निधि उपलब्ध होऊ शकले नाही. परन्तु आज घडीला कोरोना संसर्गाचा वेग आटोक्यात असल्याने जनजीवन सुरळीत होऊ लागला आहे. त्यामुळे आमगाव देवरी विधान सभेचे आमदार सहषराम कोरोटे यांनी घौडदोड सुरु केली आहे. या अनुसंघाने आमदार कोरोटे यांनी सार्वजनीक बांधकाम प्रादेशीक विभाग नागपूरचे मुख्य अभियंता सर देशमुख यांची गुरूवार(ता.१२ आँगस्ट)रोजी भेट घेवून चर्चा केली आणी विधानसभा क्षेत्राच्या विकास कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करूण दयावे या साठी साकडे घातले.
चर्चे दरम्यान आमदार सहषराम कोरोटे यांनी विधानसभा क्षेत्रातील वाईट परिस्थित असलेले रोड, रस्ते, पुलिया अशा अनेक विकास कामाबाबद लागणारी आवश्यक निधि बाबद सविस्तर चर्चा केली. यावेळी आमदार कोरोटे यांच्या सह, मोरगाव अर्जुनी क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि अभियंता स.द.देशकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Share