नगरपंचायत देवरी अंतर्गत श्रमदान कार्यक्रम

◾️नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास शाखा देवरी चे सक्रिय सहभाग

देवरी 13: नगरपंचायत देवरी च्या वतीने माझी वसुंधरा माझे कर्तव्य उपक्रमांतर्गत नगरपंचायत क्रीडांगण येथे श्रमदान करण्यात आले. श्रमदानातून स्वच्छतेचा संदेश आणि प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली.

सदर कार्यक्रमाप्रसंगी श्रमदान करून स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि वृक्षरोपण करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्याधिकारी अजय पाटणकर ,प्राचार्य के. सी शहारे ,मनोहर भाई पटेल विद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना प्रभारी एस. पी. देशमुख , टी आर देशमुख, त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास शाखा देवरी चे अध्यक्ष इंजी. घनश्याम निखाडे , उपाध्यक्ष सचिन भांडारकर, सचिव इंजी. प्रीती नेताम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित राहुन श्रमदान करण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share