अनिल कुर्वे यांनी मांडल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील समस्या, चर्चेत रंगला शिक्षण क्षेत्रातील मुद्दा
◾️शिक्षक सेनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे यांनी शिक्षकांच्या आणि गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील मांडल्या अनेक समस्या
गोंदिया 13: गोंदिया येथील शासकीय विश्रामगृह अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष माननीय ज.मो.अभ्यंकर यांचे सोबत झालेल्या सभेतील चर्चेत शिक्षक सेनेचे गोंदिया जिल्हाध्यक्ष अनिल कुर्वे यांनी शिक्षकांच्या आणि गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक समस्यांवर चर्चा केली.
सदर चर्चेत जिल्हा परिषद गोंदिया येथे अजूनपर्यंत प्राथमिक व माध्यमिक विभागात कुणालाही शिक्षणाधिकाऱ्यांचा कायमस्वरूपी पदभार देण्यात आले नाही त्यामुळे अनेक कामे रखडलेली आहेत. तसेच वेतन पथक कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे भविष्य निर्वाह निधीच्या संदर्भातील वा अन्य शिक्षण क्षेत्राशी संबंधीत अनेक कामे होत नाही. आदिवासी उपयोजने अंतर्गत होणाऱ्या शिक्षकांचे नियमित वेतन होत नाही, २० टक्के अनुदान प्राप्त शिक्षकांचे वेतन मागील तीन महिन्यांपासून झालेले नाही अशा अनेक विषयांचा समावेश होता. अनिल कुर्वे यांनी उपस्थित केलेल्या गोंदिया जिल्ह्यातील शिक्षण विभागातील समस्यांची माननीय ज.मो.अभ्यंकर यांनी दखल घेत सभेला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्याचे निर्देश दिले आणि लवकरच शिक्षणाधिकारी पदभार स्वीकारतील असे आश्र्वासन दिले.
यावेळी सहायक उपसंचालक सतिश मेंढे, प्राथमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभागाचे प्रभारी शिक्षणाधिकारी प्रदिप समरीत, शिक्षक सेनेचे भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे समन्वयक किसन शेंडे आणि शिक्षक सेनेचे जिल्हा सरचिटणीस चेतककुमार जंजाळ, महेश अहिरकर, प्रेमशोब बोरकर उपस्थित होते.