१७ ऑगस्ट पासून शाळा सुरू होणार नाही : शिक्षण विभागाच्या जीआरला सरकारची स्थगिती

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती लक्षात घेता राज्य सरकार आणि शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्ट पासून शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. टास्क फोर्स सोबतच्या झालेल्या बैठकीनंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील ज्या-ज्या भागांत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे त्या भागांत शाळा सुरू करण्याचा मतप्रवाह होता आणि त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढण्यात आला. मात्र, आता या जीआरला राज्य सरकारनेच स्थगिती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे आणि त्यातच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता शाळा तुर्तास सुरू करु नयेत असा प्रवाह काही मंत्र्यांमध्ये दिसून येत आहे. टास्क फोर्सच्या बैठकीतही शाळा सुरू न करण्याची प्रतिक्रिया आली आणि त्यानंतर शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 10 ऑगस्ट रोजी शाळा सुरू करण्याच्या संदर्भात जीआर काढला होता. यामध्ये राज्यातील शहरी भागात 8वी ते 12वीच्या तसेच ग्रामीण भागातील 5वी ते 7वीचे वर्ग सुरू करण्याच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या.

Print Friendly, PDF & Email
Share