लोकजागृती मोर्चाच्या विधानसभा अध्यक्षपदी ईश्वर कोल्हारे यांची निवड

?नागपूर येथील मुख्यालयात नियुक्तिपत्र देवुन कोल्हारे यांचे अभिनंदन केले.

देवरी १२: तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी व नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून परिचित असलेल्या म्हैसुली येथील विद्यमान उपसरपंच ईश्वर कोल्हारे हे उच्च शिक्षित तरुण सामाजीक कार्यकर्ता आहे. त्यांना सामाजीक कार्य करतांनी एखाद्या संघटनेचा हातभार लागावा या करिता लोकजागृती मोर्चा नागपूर या संघटनेचे संयोजक अँड.रमन सेनाड यांनी संघटनेच्या मुख्यालयात ईश्वर कोल्हारे यांची आमगांव-देवरी विधानसभा क्षेत्राच्या अध्यक्षपदी बुधवारी(ता.११ ऑगस्ट) रोजी निवड करुण नियुक्ति पत्र दिले.

या प्रसंगी डॉ.दिलीप वैरागड़े, ओमकार सेनाड व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी ईश्वर कोल्हारे यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात लोकजागृती मोर्चाच्या संघटनात्मक विस्तारासाठी चांगले कार्य करुण लोकांच्या अडीअड़चनी व समस्या सोडविन्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.
यांच्या या निवडीबद्दल विधानसभा क्षेत्रातील मित्रमंडळी, शुभचिंतक, उच्च शिक्षित तरुण तरुणींनी ईश्वर कोल्हारे यांचे अभिनंदन केले.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें