आमदार कोरोटे यांचा हस्ते आमगांव तालुक्यात विविध कामाचे भूमिपूजन

स्थानिक विकास निधितून मंजूर गोरठा येथे नाली बांधकामाचे तर भोसा येथे पुलाचे भूमिपूजन

आमगांव/देवरी,ता.११: आमगांव-देवरी विधानसभेचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या स्थानिक विकास निधितून मंजूर आमगांव तालुक्यातील गोरठा येथे सीमेंट नाली आणि भोसा येथे सी.डी.वर्क पाईप पुलिया बांधकामाचे भूमिपूजन आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते रविवार(ता.८ऑगस्ट) रोजी पार पडले.
गोरठा व भोसा येथील भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आमगांव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय बहेकार हे होते. या प्रसंगी किसान काँग्रेस चे तालुकाध्यक्ष गणेश हुकरे, गोरठा चे सरपंच सुषमाताई फुंडे,उपसरपंच अरविंद चूटे,भोसाचे सरपंच सुनील ब्राम्हणकर, गोरठा येथील पक्षाचे कार्यकर्ता इंदल पातोड़े, हरीहर पातोडे,भोजराज हत्तीमारे, सुकचंद रहिले, तुळसीराम पातोड़े, राजेन्द्र चुटे, शंकर चूटे, प्रदीप चुटे, यादोराव भांडारकर, मोरेस्वर डोम्बड़े, खेमराज चूटे, शंकर पातोड़े आणि भोसा येथे श्रावण बागड़े, धनीराम मटाले,मंगरू मटाले यांच्या सह दोन्ही ठिकाणी अनेक गावकरी उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share