“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

मुंबई : केंद्र सरकारने माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावे असलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलले आहे . आता भारतीय हाॅकीचे माजी जादूगार खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या नावाने हा पुरस्कार आता दिला जाणार आहे. त्यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता . एकीकडे हा वाद सुरु असताना आता ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील पुरस्काराला राजीव गांधी यांचे नाव देऊन काँग्रेसने भाजपवर कुरघोडी केली. आतापर्यंत राजीव गांधी जयंती ही माहिती तंत्रज्ञान दिन म्हणून साजरी केली जात होती. यापुढे त्यांच्या नावे पुरस्कार दिला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर बोलताना काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. राजीव गांधी यांनी देशात नवीन टेक्नॉलॉजी आणली. मात्र काही लोक जाणीवपूर्वक त्यांचं नाव काढत आहेत. त्यामुळं हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. जेवढे ते नाव संपवण्याचा प्रयत्न करतील तेवढं त्यांचं नाव वरती येत राहील, असं अस्लम शेख यांनी म्हटलं आहे.

नवीन योजना कुठलीही न आणता जुन्या योजनांची केवळ नाव बदलली जाताहेत. ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत, असं म्हणत टीका अस्लम शेख यांनी मोदींवर टीका केली आहे.

Print Friendly, PDF & Email
Share