नरेंद्र मोदींचा नीरज चोप्राला फोन, कौतुक करत फोन ठेवताना म्हणाले…
नवी दिल्ली 08: टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातुन मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नीरज चोप्राला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच त्यांनी नीरजला फोनही केला आहे.
फोनवर झालेल्या संभाषणामध्ये ऑलिम्पिक समारोपाच्या देशाने जाताना तू देशाला खूश केलं असल्याचं मोदी म्हणाले. यावर नीरज म्हणाला, भारतासाठी मला काहीतरी करायचं होतं. मला सुवर्ण जिंकायचं होतं. मला सर्व भारतीयांचा पाठिंबा होता. तुम्ही सुद्धा स्पर्धा बघत होता खूप चांगलं वाटत आहे.
ऑलिम्पिक एक वर्ष उशिरा झाल्याने जास्त मेहनत घ्यावी लागली असेल. तुला दुखापत झाली असतानाही तू चांगली कामगिरी केलीस. हे सर्व तुझ्या मेहनतीचं फळ असल्याचं म्हणत मोदींनी नीरजचं कौतुक केलं. मी माझं 100 टक्के दिलं असल्याचं नीरज मोदींना म्हणाला. तुझ्यामुळे इतर तरूणांना क्रीडा क्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा मिळेल, असं मोदी म्हणाले.
दरम्यान, तुझ्या आई-वडिलांना माझ्याकडून नमस्कार सांग आणि राधाकिशनलाही माझ्याकडून शुभेच्छा दे त्यांनी तुझ्या खांद्याला लावून काम केलं आहे, असंही मोदी म्हणाले. त्यासोबतच त्यांनी येत्या 15 ऑगस्टला आपण भेटत आहोत, असं नीरजला सांगितलं.