गाडीच्या सनरुफमधून डोकवाल तर…’; नागपूर पोलिसांचा आक्रमक पवित्रा
नागपूर 08:नागपूरमध्ये रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. याच ड्रायव्हरांना धडा शिकवण्यासाठी नागपूर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार कारच्या सनरुफमधून बाहेर डोकावणं, किंवा कारच्या खिडकीच्या बाहेर डोकावत स्टॅंटबाजी करणाऱ्यांना नागपूर पोलिसांनी थेट अटकेचा इशारा दिलाय.
कारच्या सनरुफवरुन किंवा खिडकीतून बाहेर डोकावल्यास थेट अटक करणार असल्याचं नागपूक वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आव्हाडे यांनी सांगितलं आहे. कारच्या खिडकीच्या बाहेर डोकावत स्टॅंटबाजी करणाऱ्यांवर आता वाहतूक पोलीसांची नजर असणार आहे.
नियम मोडणारी वाहनं सीसीटीव्हीत कैद झालं की लगेच वाहनचालकांच्या मोबाईलवर ई चलान पाठवाला जातो. पण नागपूर पोलिसांच्या या ई-चलानला साधारण दीड लाख पेक्षा जास्त वाहनचालकांनी केराची टोपली दाखवल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, ई-चलानची रक्कम थकवणाऱ्या वाहनधारकांविरोधात वाहतूक पोलीस कठोर कारवाई करणार याकडे सर्वांच लक्षं लागलं आहे. नागपूर पोलिसांसमोर ई-चालानचा दंड वसूल करणे आणि नागपूरमधील वाहनधारकांना शिस्त लावण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.