लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, प्रत्येकी ‘इतक्या’ हजारांची मदत मिळणार
मुंबई 06: कोरोना काळात बंदीचा फटका अवघ्या देशाला बसला आहे. विविध क्षेत्रात काम करण्याऱ्या प्रत्येक सामान्य माणसाला याचा फटका बसला. महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी भागात रहाणारा प्रत्येक सामान्य माणूस, कलाकार, व्यापारी, रोजगारी, शेतकरी या सगळ्यांना या महामारीचा जबर हादरा बसला आहे.
कोरोनामुळे आपल्या कलेच्या माध्यमातुन महाराष्ट्राची लोककला जपण्याचं काम करणाऱ्या लोककलावंताना अडचणींचा सामना करावा लागला. 2 वर्ष झालं घरातच बसून असल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण आला असल्याने त्यांना मदत करणं गरजेचं आहे, हे जाणून महाराष्ट्र सरकारने एकूण 56 हजार लोककलावंताना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. आणि या संदर्भात विस्तृत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. सर्व लोककलावंताना दिलासा देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. एकुण 56 हजार लोककलावंताना प्रत्येकी 5 हजार रूपये कोविड दिलासा पॅकेज म्हणून देत असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
शाहीर, तमाशा, पथनाट्य, नाटक, संगीतबारी, या सर्व लोककलांना जिवंत ठेवण्यासाठी आपलं आयुष्य घालवणाऱ्या या सगळ्या कलाकारांना सरकार मदत करत आहे, असं यावेळी मंत्री अमित देशमुख म्हणाले.