डवकी धान केन्द्रातील सडलेले धान इतरत्र हटवा…
डवकी सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य मेश्राम व गावकऱ्यांची मागणी.
देवरी ०६: खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये डवकी येथील आदिवासी विविध कार्यकारी सह- कारी संस्थे मार्फत खरेदी केलेले अंदाजे एक हजार क्विंटल धान जे उघड़यावर ठेवले होते. हे उघड़यावर ठेवलेले धान देवरी येथील आदिवासी विकास महामंडळाने उचल न केल्याने हे धान पावसाळ्यातील पाण्यात भिजुन सडून पडले. आणि आता या सडलेल्या धान्यापासुन अतिशय घानेरडी दुर्गंध येत आहे. या दुर्गंधिमुळे या खरेदी केन्द्रा जवळपास राहणारे लोक व सिद्धार्थ विद्यालयाचे विद्यार्थ्यांसह या परिसरात आवागमन करणाऱ्या लोकांना या दुर्गंधिचा त्रास होत आहे . या त्रासामुळे त्यांच्या आरोग्यवार दुष्परिणाम तर होनार नाही या भितीपोटी परिसरात राहनारे लोक व सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य महेन्द्र मेश्राम यांनी डवकी च्या आदिवासी कार्यकारी सह संस्थे मार्फत देवरी येथील आदिवासी विकास महामंडळास डवकी येथील केन्द्रातिल सडलेले धान त्वरित येथून इतरत्र हटविन्याची मागणी गुरुवार(ता.५ ऑगस्ट) रोजी केली आणी याबाबद निवेदन ही दिले.
दिलेल्या निवेदनात डवकी येथील लोकांनी व सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम यांनी म्हटले आहे की, खरीप हंगाम २०२०-२१ या वर्षात शासनाच्या आदेशाप्रमाने आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व आदिवासी विविध कार्यकारी संस्थे मार्फत अनेक ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरु करुण धान खरेदी केली सदर धान पावसाळ्यापुरवी आदिवासी विकास महामंडळाने उचल करने गरजेचे होते. परंतु सदर धान उचल न केल्याने धान खरेदी संस्थेने या धानावर टाटपत्री बांधून ठेवली होती आणि पावसाळ्यातील पाण्यात हे सर्व धान ओला झाले . आता ह्या सडलेल्या धान्यापासुन सर्वत्र दुर्गंध पसरत आहे. अशाच प्रकार डवकी येथे सुरु आहे.
या डवकी केंद्रात ठेवलेले धान सडल्याने धान खरीदी केंद्र परिसरात सर्वत्र धानखरेड़ी दुर्गंध पसरत असल्याने या धान केंद्र परिसरात राहनारे नागरीक लोक,समोर असलेले विद्यालय येथील विद्यार्थी शिक्षक वर्ग, बाजूला असलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात येणारे अधिकारी व कर्मचारी,मागे असलेले ग्रा.पं. कार्यालय येथे येणारे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, आणी गावात कामनिमित्य आवागमन करणारे इतर लोकांना या दुर्गंधि पासून त्रास होत आहे, आणि या दुर्गंधि मुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम तर होणार नाही या भीति पोटी वापरत आहेत.
एकीकडे शासन कोरोना संसर्गामुळे गाव व शहर परिसर स्वच्छ ठेवून आपल्या अरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान करते तर दूसरी कड़े आदिवासी विकास महामंडळाच्या दीरंगामुळे सदर केन्द्रातिल धान उचल न केल्याने सर्व धान सडून दुर्गंधी पसरत आहे
तरी हे सडलेले सर्व धान डवकी केन्द्रातुन इतरत्र हटवा या मागनीला धरून एक निवेदन डवकी येथील आदिवासी सह संस्थेच्या संचालक मंडळाला दिले. या निवेदनावरुन डवकी केन्द्रयाच्या संचालक मंडळानी सदर सडलेले धान इतरत्र हलविण्याची मागणी आदिवासी विकास महामंडळ देवरी यांना केली.
निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात डवकी येथील सिद्धार्थ विद्यालयाचे प्राचार्य महेंद्र मेश्राम ,सरपंच उमराव बावनकर, उपसरपंच गोपाल परगाये, नागरिक गजानन बावनकर, शकील शेख, दिनेश फरदे, विलास फरदे, रामचंद्र परसगाये, धनराज राऊत, राजकुमार किरसान, नंदलाल फरदे यांच्या सह अनेक नागरिकांच्या समावेश होता.