सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल तर पाय अडकून पडाल; संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य
मुंबई: राज्यपालांनी राज्यापालांचं काम करावं. त्यांच काम अत्यंत मर्यांदीत आहे. असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल तर पाय अडकून पडाल, असे इशारा वजा सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी यावेळी केले.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नांदेड, हिंगोली आणि परभणीचा दौरा आखला आहे. या दौऱ्यात बैठकांसह हॉस्टेल उद्घाटनाचा कार्यक्रम आखला आहे. राज्यापालांच्या या दौऱ्यावर महाविकास आघाडीमधील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर संजय राऊत यांनीदेखील हा मुद्दा पकडत राज्यपालांना ताटकळत पडलेल्या १२ आमदारांच्या यादीची आठवण करून दिली आहे. तसेच भाजपशासित राज्यात राज्यपाल का दौरे काढत नाहीत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ‘राज्यपालांनी राज्यापालांचं काम करावे. त्यांच काम अत्यंत मर्यादित असून सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये, असा इशारा दिला. राज्यपालांकडून घटनाविरोधात कृत्य सुरू आहे. सरकारच्या कामात हस्तक्षेप करू नये. असे म्हणत राज्य घटनेनुसार राज्यपालांनी नियम पाळले तर बर होईल असे म्हटले आहे. राजभवन हे सरकारला मदत करण्यासाठी असतं. पाय खेचण्यासाठी नाही.
असे सांगत महाराष्ट्र सरकारचे पाय खेचण्याचा प्रयत्न कराल तर पाय अडकून पडाल, असे इशारा वजा सूचक वक्तव्य राऊत यांनी यावेळी केले. राज्यपालांना राजकीय कारणसाठी सरकारची अडवणूक करू नये. त्यांनी १२ आमदारांचे काय झाले ते आधी पाहावे असे राऊत यांनी म्हटले आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची भूमिका मांडली. ‘भगतसिंह कोश्यारी यांचा सरकारच्या कामातील हस्तक्षेप वाढला आहे. ते घटनाबाह्य वर्तन करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला. ‘कोश्यारी हे कधीकाळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. पण, आता ते मुख्यमंत्री नाहीत, राज्यपाल आहेत हे त्यांनी विसरू नये,’ असे मलिक यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते.