पोस्ट ऑफीसच्या किसान विकास पत्र या योजनेतुन दाम दुप्पट करण्याची सुवर्णसंधी

मुंबई 5 : पैसा हा मानवी गरजा पुर्ण करण्याबरोबरच उज्ज्वल भविष्यासाठी कामाला येणारी मोठी गुंतवणुक आहे. आपण कमावलेला पैसा सुरक्षित हातात असावा असं प्रत्येकाला वाटतं म्हणुन आपण आपला पैसा योग्य गोष्टीत गुंतवत असतो. मग ती गुंतवणुक योजनेच्या माध्यमातुन असेल किंवा बॅंकेच्या आपण नेहमी फायद्याचा विचार करतो.

पोस्ट ऑफिस सर्वांसाठी एक योजना घेऊन आलं आहे. त्या योजनेमध्ये दाम दुप्पट होणार आहे. या योजनेत गुंतवणुकदाराला चांगला परतावा तर मिळतोच पण आपल्याला सरकारी गॅरंटी पण मिळते व पैसै पण सुरक्षित राहतात. या योजनेमध्ये व्याजदर व गुंतवणुक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर निश्चित केला जातो. इंडीयन पोस्टच्या वेबसाईटनुसार या योजनेचा मॅच्युरिटी अवधी 124 महीने आहे. म्हणजेच 10 वर्ष 4 महीन्यांनी ग्राहकांचे पैसै दुप्पट होतील.

आर्थिक वर्ष 2021 साठी पहील्या तिमाहीसाठी 6.9 टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला होता. या दरात तुमचे पैसै 124 महीन्यात दुप्पट होतील म्हणजेच 10 लाख गुंतवले तर 124 महीन्यात 20 लाख रुपये मिळतील. किसान विकास पत्र या नावाने ही योजना चालेल हे एका प्रकारचे प्रमाणपत्र असेल जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधुन घेऊ शकता. बाॅंडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या स्वरुपात हे मिळतं.

पॅनकार्ड व आधारकार्ड या कागदपत्राची पुर्तता करावी लागेल, तर दोन पासपोर्ट साइज फोटो, निवास प्रमाणपत्र ( लाईटबिल, टेलिफोन बिल, बॅंक पासबुक) हे कागदपत्रे लागतील.

Share