वेदांत वंजारी बारावीच्या परीक्षेत देवरी तालुक्यातून प्रथम

डवकीच्या सिद्धार्थ विद्यालयाचा निकाल 100 टक्के

देवरी 05-राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने यावर्षी घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेत डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला. यामध्ये विज्ञान शाखेतील वेदांत वंजारी याने 91 टक्के गुण संपादन करीत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविले. या यशाबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उल्लेखनीय म्हणजे वेदांतचे आईबाबा तो 1 वर्षाचा असताच एका अपघातामध्ये त्याला कायमचे सोडून गेले. एवढेच नाही तर त्याचे सांभाळ करणारे त्याचे मोठे बाबासुद्धा यावर्षी कोरोनाच्या साथीत मृत्यू पावले. वेदांत हा बुद्धीने अत्यंत तल्लख असून आता त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही त्याच्या मोठ्या आईवर आली आहे. अशातही डगमगून न जाता त्याने हे घवघवीत यश संपादन केले आहे. वेदांत हा भावी डॉक्टर होण्याचे स्वप्न बघत आहे.

याशिवाय रोशनी रहांगडाले हिने 83 तर शेजल झामरे हिने 82.5 टक्के गुण प्राप्त केले आहेत. कलाशाखेतून निरुपा ताराम हिने 80.83, पूजा बानक हिने80.5 आणि शुभांगणा कोल्हे हिन74.33 गुण मिळविले. शाळेचे प्राचार्य महेंद्र मेश्राम, प्रा. योगेश बोरकर, प्रा. धर्मेंद्र भोवते. प्रा.सुषमा जवंजार, प्रा. ममता टेंभूर्णीकर,प्रा. सरिता मेश्राम, प्रा. भावना बघेल , भूपेंद्र कुरसुंगे , मुकेश टेंभरे आदींनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि विद्यालयाच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले आहे.

Print Friendly, PDF & Email
Share