शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दया – सौ. करुणा कुर्वे

देवरी 04: सरकारी योजनेनुसार देवरी उपविभागातील सुमारे ९०० शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विहीर/ बोरवेल केले आहे. पण विज कनेक्शनशिवाय त्याचा शेतीला काहिच उपयोग नाही. शेतात विज कनेक्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी अर्जसुद्धा केले आहे. यापैकी सुमारे ४०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विज कनेक्शनसाठी पैसेही भरलेले आहे. पण मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना वीज कनेक्शन मिळालेले नाही. यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीकडून उपकार्यकारी अभियंता उपविभाग देवरी यांना निवेदन निवेदन देवून शेतकर्‍यांना त्वरित विज कनेक्शन दया अशी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ. करुणा कुर्वे यांनी मागणी केली. यासंबंधी माननीय मुख्यमंत्री, माननीय ऊर्जामंत्री आणि माननीय कृषीमंत्री, यांना निवेदन पत्र पाठवून शेतकऱ्यांना विज कनेक्शन देण्याविषयी विनंती केली आहे.निवेदन देतांना शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ.करुणा कुर्वे, तालुका संघटिका सौ. प्रिती उईके, तालुका उपसंघटिका सौ. प्रिती भांडारकर, देवरी शहर संघटिका सौ. निलेशा रामटेके, सारिका आयतुलवार, सौ. प्रभा येरणे, सरिता साखरे, अनिता वैद्य उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share