मेरीटोरियस शाळेची साक्षी तालुक्यात प्रथम; शाळेचा निकाल 100 टक्के

तिरोडा 04 : स्थानिक मेरीटोरियस पब्लिक शाळेची विद्यार्थिनी साक्षी संतोष अग्रवाल हिने 96.4 टक्के घेवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. शाळेचा निकाल 100 टक्के लागला.

तसेच आस्था बरबटे हिने 95.8 टक्के गुण मिळवून द्वितीय व पलक परिहार हिने 94 टक्के गुण घेवून तृतीय क्रमांक मिळविला. शाळेने याही वर्षी 100 टक्के निकाल देवून आपली परंपरा कायम ठेवली. संचालक मुकेश अग्रवाल, प्राचार्य तुषार येरपुडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Print Friendly, PDF & Email
Share