छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय देवरी HSC बोर्ड परीक्षेत बाजी

देवरी,ता.०४: देवरी येथील कृष्णा सहयोगी तंत्र शिक्षण संस्था अंतर्गत संचालित छत्रपती शिवाजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान शाखेतून कु. दर्शना धनंजय वलथरे हिने 600 पैकी 528 गुणांचा 88 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक, कु. दुर्गा रामेश्वर आचले हिने 527 गुणांसह 87.83 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर कु. तेजस्विनी ओमप्रकाश पुराम हिने 501 गुणांसह 83.50 टक्के मिळवून विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकाविले. तसेच कला शाखेतून कु. मंजू रतन पडोती हिने 600 पैकी 526 गुणासह 87.67 टक्के मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक कु. मैनाताई चमरू सलामे हिने 452 गुणासह 75.30 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक तर प्रदीप आनंदराव दर्रो याने 442 गुणांचा 73.67 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. विद्यालयातील कला व विज्ञान दोन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला असून विज्ञान शाखेतील नऊ विद्यार्थी तर कला शाखेतील दोन विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले. तसेच विज्ञान शाखेतील 45 व कला शाखेतील 16 विद्यार्थी प्रथम श्रेणीत पास झाले. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य एम.जी. भुरे, संस्थेचे अध्यक्ष झामसिंगजी येरणे व सचिव अनिलकुमारजी येरणे व संस्थेचे उपाध्यक्ष सुनीलकुमारजी येरणे तसेच सर्व प्राध्यापक प्राध्यापिका व सर्व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

Print Friendly, PDF & Email
Share