अर्धवेळ महिला सेवकांनी आमदार – सहषराम कोरोटे यांना दिले मागण्यांचे निवेदन

★यावेळी आमदार कोरोटे यांनी सदर मागण्या शासना पर्यत पोहचविण्याचे दिले आश्वासन

देवरी 04 :महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला अटेंडंट फेडरेशनच्या नेतृत्वाखाली, महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण जिल्हा परिषदेसमोर १०५७९ चे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. तसेच गोंदिया जिल्हा परिषदेपुढे शेवटचा दिवस २६ जुलै २०२१ पासून निषेध आंदोलन सुरू केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्रातील आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या अर्धवेळ महिला परिचरांना नियमित सेवेत सामावून घेऊन वेतन देण्यात यावे, अशी मागणी आंदोलक महिला परिचारिका करत आहेत.
गणवेश आणि ओळखपत्र दिले पाहिजे. कोविड भत्ता आणि अतिरिक्त कामासाठी भत्ता इत्यादी विविध मागण्यांसंदर्भात आंदोलन सुरू आहे.

आमगाव -देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या देवरी येथील निवासस्थानी
जिल्हा परिषद महिला अटेंडंट फेडरेशनच्या कोषाध्यक्ष – शारदा शहारे यांनी गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव – इसुलाल भालेकर यांच्या उपस्थितीत आमदार – सहषराम कोरोटे यांची भेट घेवून निवेदन दिले आणि सांगीतले की महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला अटेंडंट फेडरेशन, जिल्हा परिषद यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील कार्यालया समोर बेमुदत चळवळ चालू आहे.

महिला अटेंडंट फेडरेशनच्या वतीने आमच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री,आरोग्य मंत्री यांच्या सह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
या प्रसंगी आमदार – सहषराम कोरोटे यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात आरोग्य केंद्र / उपकेंद्रात काम करणाऱ्या महिला परिचरांची समस्या मांडण्याचे आश्वासन दिले.
सदर निवेदन सादर करते वेळी-आरोग्य केंद्र / उपकेंद्र महिला परिचर महासंघ सालेकसाचे सचिव – हेमलता पुंडकर. देवरी तालुका सचिव – सलीना राऊत, मीना रामटेके.ज्योती कुंभारे. हिरण टेंभूरकर. धनवंता वासनिक. आदि महिला परिचर उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share