ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या 2 इसमांवर देवरी पोलिसांची कारवाई

◾️घटनास्थळी एकुण 22000/- रू.चा मुद्देमाल जप्त

देवरी 4: देवरी पोलिसांनी अवैध्य ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या इसमांवर धडक कारवाई केली असून यामध्ये घटनास्थळी एकुण 22000/- रू.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे जुगार खेळणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सदर कारवाई ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे पोलीस स्टेशन देवरी यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे देवरी येथील विक्की मेन्स वेअर कापड दुकानाचा मालक शरबजीतसिंग उर्फ विक्की सतनामसिंग कटरोडे व त्याचा मित्र नामे संकेत उर्फ मोनु राजेंद्र शर्मा वय 26 वर्ष रा. सिवील लाईन वार्ड क्र. 7 ,देवरी हे विक्की मेन्स वेअर कापड दुकानात अवैधरित्या ऑनलाईन सट्टा जुगार खेळत असल्याची माहीती मिळाल्याने ठाणेदार रेवचंद सिंगणजुडे यांनी पोलीस स्टॉफ सह त्यांचे कापड दुकानात रेड घातली असता आरोपी हे आपले कापड दुकानात त्यांचे ताब्यातील मोबाईलमधील फनगेम नावाचे मोबाईल अँपद्वारे स्वताची आयडी तयार करुन लोकांकडुन आनलाईन सट्टा घेतानी पंचासमक्ष मिळुन आल्याने आरोपीकडुन त्याचे ताब्यातील समॅसंग कंपनीचा मोबाईल कि.10000/रु., रिअलमी कंपनीचा मोबाईल कि. 10000/- व आरोपी क्र.1 याचे खिशातुन 2000/- नगदी , पैशाचे व्यवहाचा देवानघेवानचा एक कागदी चिटोरा व एक लाल रंगाचा व्यहाराचा नोटबुक कि.00/00 असा एकुण 22000 / – रु.चा मुद्देमाल अवैधरित्या मिळुन आला.

आरोपी 1) शरबजीतसिंग उर्फ विक्की सतनामसिंग कटरोडे वय 29 वर्ष रा. गणेशचौक वार्ड क्र. 2, देवरी, 2) संकेत उर्फ मोनु राजेंद्र शर्मा वय 26 वर्ष रा. सिवील लाईन वार्ड क्र. 7,देवरी यांचेवर अपराध क्र. 189/2021 कलम 12 (अ) म.जु.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कार्यवाहीमध्ये आरोपितांकडुन एकुण 22000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाही देवरी पोलिस्टेसनचे ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे पोस्टे देवरी, पोलीस स्टॉफ, पोउपनी नरेश उरकुडे, पोशी दिलीप हातझाडे /1766 , पोशी रामराव कांदे/1813 यांनी केलेली आहे.

पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे आदेशान्वये तसेच अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कँप देवरी व उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरित्या ऑनलाईन जुगार खेळणाऱ्यावर आळा घालण्यासाठी पोलीस स्टेशन देवरी अंतर्गत काल 3 ऑगस्ट रोजी कार्यवाही करण्यात आली.

Share