देवरी येथिल महा लोकअदालत मध्ये 1411 प्रकरणांचा निपटारा
◾️लोकदलातीत 9,76,299/- रु. दंड वसूल
प्रा. डॉ. सुजित टेटे
देवरी 2: देवरी येथिल राष्ट्रीय महालोक अदालत मध्ये एकूण 1411 प्रकरणाचे निपटारे करण्यात आले असून त्यापैकी 16 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असलेले होती तर 1395 प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यापूर्वीची होती. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणापैकी धनादेशाचे अनादर झालेल्या प्रकरणात 1,30,000/-. वसूल करण्यात आले असून दाखल कारण्यापूर्वीच्या प्रकरणात 8,46,299/- रुपये जमा करण्यात आलेले आहे. अशा प्रकारे 9,76,299/- रु. वसूल करण्यात आलेली आहे. सदर लोक अदालतीची संपूर्ण जिल्हात चर्चा असल्याचे वृत्त आहे.
सदर लोकअदालतीमध्ये पॅनल प्रमुख म्हणून एम. डब्लू ए.एम. जे. शेख दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी देवरी हे होते. पॅनल सदस्य म्हणून ऍड. एम. एस.शहारे , व ऍड. सौ. व्ही एस बारसे सामाजिक कार्यकर्ता म्हणून जबाबदारी सांभाळली. त्याचप्रमाणे लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी ऍड .पी. एन. संगीडवार , तालुका वकील संघ , ऍड. गंगबोईर , ऍड. बावरिया , ऍड . मस्करे , ऍड. भाजीपाले , ऍड. संगीडवार , सहाय्यक अधीक्षक कांबळे , बिसेन , शेख , बालधारे , खांडेकर यांनी प्रयत्न केले.