भेसळयुक्त डिझेल विक्री करणार्या अड्डयावर धाड
तिरोडा 29- येथील बिरसी नाल्याजवळील एका घरातून 16975 रुपयांचे भुसळयुक्त डिझेल व इतर मुद्येमाल असा 25 हजार 225 रुपयांंचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 28 जुलै रोजी पोलिस व अन्न पुरवठा विभागाने संयुक्तरित्या केली.
बिरसी नाला परिसरात राहणारा टिकेशकुमार प्रजापती हा आपल्या घरामध्ये भेसळयुक्त डिझेलचा साठा करुन त्याची विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तालुका अन्न पुरवठा विभागाच्या अधिकार्यांसह प्रजापती याच्या घरावर धाड टाकली. यावेळी घराला कुलूप लागले होते. दरम्यान दोन पंचासमक्ष घराचे कुलूप उघडले असत घरात भेसळयुक्त डिझेल व भेसळीचे अन्य साहित्य आढळून आले.
पोलिसांनी घरातून वेगवेगळ्या प्लास्टिक कॅन, ड्रममध्ये ठेवलेले 16 हजार 975 रुपयांचे अंदाजे 175 लिटर भेसळयुक्त डिझेल, 15 लिटर केरोसीन, 40 लिटर थिनर, रिकामे ड्रम, प्लास्टिक चाळी, पाईप, मग्गा असा एकूण 25 हजार 255 रुपयांचा मुद्येमाल जप्त केेला. टिकेशकुमार शिवप्रसाद प्रजापती याच्यावर कलम 3, 7 जीवनावश्यक वस्तू अधिनियमन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार्यवाई उपविभागीय अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश पारधी, सपोनि अभिजित जोगदंड, पोना थेर, पोशि सवालाखे, अंबुले, भैरम यांनी केली.