भंडारा-गोंदिया जिल्ह्यात व्यापा-यांसाठी निर्बंध शिथिल करा :आमदार डॉ परिणय फुके

गोंदिया 29: भंडारा गोंदिया जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. परंतु सातत्याच्या लॉकडाऊनमुळे व्यापा-यांवर वेळेचे निर्बंध टाकुण दुपारी चार वाजता दुकाने बंद करण्यास सांगत आहे.
यामुळे छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झालेली आहे. व्यापा-यांच्या अर्थकारणावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असुन लहान मोठ्या व्यापा-यांना जगणे कठीण होवून बसले आहे. हॉटेल व्यवसाय खर तर सायंकाळी सुरू होतात. बरेच ग्राहक चार नंतरच खरेदीला बाजारामध्ये जात असतात. त्यामुळे चार वाजताचे दुकान बंद करण्याचे आदेश असल्याने व्यापारी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण असुन नोकरदारांना वेतन देणे सुध्दा व्यावसायिकांना कठीण होवून बसले आहे.
त्यामुळे छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची झालेली स्थिती सुधारण्याकरीता त्यांना दिलासा देण्याकरीता दुकाने चार वाजता बंद करण्याची अट तातडीने शिथिल करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ परिणय फुके यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रातुन केलेली आहे.

Share