खुशखबर ! आता ‘या’ कागदपत्रांव्दारे घरा शेजारच्या पोस्ट ऑफिसमध्ये ‘तात्काळ’ बनवा पासपोर्ट….
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)– पोस्ट ऑफिस ने तुमच्यासाठी एक विशेष सुविधा सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही सहजपणे पासपोर्ट बनवू शकता. यासाठी पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसएस) काऊंटरवर जावे लागेल आणि रजिस्ट्रेशन करून अर्ज करावा लागेल. इंडिया पोस्टने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.
पोस्ट ऑफिसने ट्विटमध्ये लिहिले आहे की, आता आपल्या जवळच्या पोस्टाच्या सीएससी काऊंटरवर पासपोर्टसाठी नोंदणी आणि अर्ज करणे सोपे झाले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्टात जा.
पासपोर्ट इंडियाच्या वेबसाइटने काय म्हटले?
पासपोर्ट इंडिया वेबसाइटनुसार, पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र पासपोर्ट कार्यालयांच्या विस्तारित शाखा आहेत आणि पासपोर्ट जारी करण्यापासून संबंधित फ्रंट-अँड सेवा प्रदान करतात. ही केंद्र टोकन जारी करण्यापासून पासपोर्ट जारी करण्यासाठी अर्ज देण्यापर्यंत कार्यक्षमता कव्हर करतात.
ऑनलाइन अॅप्लीकेशननंतर काय करावे?
ज्या लोकांनी पासपोर्टसाठी रजिस्ट्रेशन आणि अर्ज केला आहे
ते लोक पासपोर्ट सेवा केंद्रावर ऑनलाइन अॅप्लीकेशन सबमिशननंतर अॅप्लीकेशन प्रिंट रिसिट आणि मुळ कागदपत्रांसह उपस्थित होणे आवश्यक आहे.
याशिवाय ज्या लोकांनी पासपोर्टसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन आणि अर्ज केले आहे.
ते जवळच्या पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट सेवा केंद्रावर अॅप्लीकेशन प्रिंट रिसिट आणि मुळे कागदपत्रांसह जाऊन प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
कोणती कागदपत्र आवश्यक:
पासपोर्ट बनवण्यासाठी जन्म दाखला, दहावीची मार्कशीट, मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंगग लायसन्स, रेशन कार्ड घेऊन जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.