TOKYO 2020 : मीराबाई चानू यांनी मिळवलेलं यश अन्य खेळाडूंना प्रेरणा, विश्वास देईल : आ. सहेषराम कोरोटे
देवरी 24– टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत महिलांच्या 49 किलो वजनी गटात देशाला वेटलिफ्टिंगचं रौप्यपदक आणि पहिलं ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचं देवरी आमगाव विधानसभेचे आमदार सहेषराम कोरोटे यांनी भरभरून अभिनंदन केलेला आहे. मीराबाई चानू यांनी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मिळवलेलं यश भारतीय संघातील अन्य खेळाडूंना उत्तम कामगिरी करुन पदक जिंकण्यासाठी प्रेरणा, विश्वास देईल, अशा शब्दात आमदार कोरोटे यांनी मीराबाई चानू यांचं कौतुक केलं.
2016 च्या रिओ ऑलिंपिकमधल्या अपघाती अपयशावर मात करुन मीराबाई चानू यांनी यंदाच्या टोकियोमध्ये जिंकलेलं पदक हे अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेनं जीवनात कसं यशस्वी व्हावं, याचं आदर्श उदाहरण असल्यांचही यांनी म्हटलं आहे. भारतीय हॉकी संघानं आपला पहिला सामना न्यूझिलंडविरुद्ध 3-2 असा जिंकल्याबद्दल यांनी संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं असून अन्य खेळाडूंनाही उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.