2 कोटी रूपयांच्या लाच प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, पोलिस दलात खळबळ

औरंगाबाद – परभणी जिल्ह्यातील सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस नाईक यांना तब्बल दोन कोटी रुपयाच्या लाचेची मागणी करत त्यामधील १० लाख रुपयांची रक्कम घेताना मुंबईच्या अ‍ॅन्टी करप्शन पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण असे लाच घेणाऱ्या अधिकारी व पोलिस नाईकाचे नाव आहे. लाच घेतल्याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलू पोलिस स्टेशनमध्ये एका अपघात प्रकरणी गुन्ह्याची नोंद होती. या गुन्ह्यातील मयताच्या पत्नीसोबत तक्रारदाराची मोबाईलवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही ऑडिओ क्लिप उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांच्या हाती लागली दरम्यान पाल यांनी तक्रारदारास बोलावून यातून बाहेर पडायचे असल्यास दोन कोटी रुपये रुपयाची मागणी केली व फोन द्वारे शिवीगाळही केली.

याप्रकरणी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी केली व सापडा लावून अधिकाऱ्यास व त्याच्या सहकाऱ्यास रंगेहाथ पकडले.

Print Friendly, PDF & Email
Share