सरकारी कर्मचाऱ्यांनो फोनवर बोलताना आता नीट बोला, ‘या’ 9 सूचना पाळाव्या लागणार!

मुंबई: महाराष्ट्र सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ड्रेसकोड लागू केला होता. त्यानुसार सरकारी कार्यालयातून जीन्स आणि टी-शर्ट हद्दपार करण्यात आलं होतं. आता सरकारने सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोन वापराबाबत सूचना जारी केल्यात. याबाबत राज्य सरकारतर्फे एक परिपत्रक काढण्यात आलं आहे.

कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी 9 महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच भ्रमणध्वनीवर बोलताना सौजन्यपूर्ण भाषेचा वापर करावा. तसेच बोलताना इतरांच्या उपस्थितीची जाणीव ठेवावी, असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. 

भ्रमणध्वनीवर बोलताना सौम्य आवाजात बोलावे, बोलताना वाद घालू नये तसेच असंसदीय भाषेचा वापर करू नये. तसेच कार्यालयीन कामासाठी भ्रमणध्वनीचा वापर करताना लघु संदेशाचा शक्यतो वापर करावा. तसेच मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेत संवाद साधावा, अशी सूचना यात देण्यात आली आहे. 

भ्रमणध्वनीवर कार्यालयीन कामकाजासाठी समाज माध्यमाांचा वापर करताना वेळेचे आणि भाषेचे तारतम्य बाळगावं. तसेच आत्यावश्यक वैयक्तिक दूरध्वनी हे कक्षाच्या बाहेर जाऊन घ्यावेत, अशीही सूचना त्यांनी दिलीये. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात / बैठकी दरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी सायलेंट किंवा व्हायब्रेट मोडवर ठेवावा, असंही सांगण्यात आलं आहे.

Share