१ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५ % पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय
मुंबई 23: कोरोनाचे संकट बघता या वर्षी सुद्धा सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५ % पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत,याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती
@scertmaha लवकरच जाहीर करेल. अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.