ब्लॉसम स्कूलमध्ये ऑनलाइन तंत्रज्ञानाच्या मदतीने गुरुपौर्णिमा साजरी

देवरी 23: स्थानिक ब्लॉसम पब्लिक स्कुल येथे ऑनलाईन तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखी गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. यामध्ये केजी पासून 7 व्या वर्गाचे विद्यार्थी सहभागी झालेले होते.

आई ही मुलांची पहिली शिक्षिका आहे. कोरोना काळात आईने आपल्या मुलांना जीव कि प्राण करत घरीच शिक्षकाच्या मदतीने शिकविण्याचे महान कार्य केले. याउद्देशाने यावर्षीची गुरुपौर्णिमा खऱ्या अर्थाने आईला शुभेच्छा दिल्या तरच सार्थ ठरेल असे मत प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी मांडले.

ब्लॉसम स्कुलच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी भेट कार्ड स्पर्धा , भाषण स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी हातानी तयार केलेले भेट कार्ड्स शिक्षकांना समर्पित केले आणि गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

तर 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेतच आपल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आणि गुरु पौर्णिमा साजरी केली. यावेळी प्राचार्य , शिक्षक आणि शिक्षिका मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्कृती लांजेवार आणि आभार इशिता उंदीरवाडे हिने मानले.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी केजी च्या शिक्षिका प्रगती कुंडलकर , प्राथमिक चे नलू टेंभरे , तनुजा भेलावे , संगीत काळे , भोजराज तुरकर , राहुल मोहुर्ले , विश्वप्रित निकोडे , योगिता कोसरकार , स्वाती पालांदूरकर आणि इतर शिक्षकांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share