चिखलाने स्वागत करणारे गाव बघतले का ? देवरी तालुक्यातील भयानक परिस्थिती …!

?अकार्यक्षम सरपंच आणि ग्रामपंचायत प्रशासनामुळे लोक संतापले

प्रतिनिधी
देवरी 22: गोंदिया जिल्हातील देवरी तालुका मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वच्छ पिण्याचे पाणी आणि पक्के रस्ते या गोष्टी प्रत्येक गावाला प्राथमिक गरज म्हणून आवश्यक आहेत परंतु देवरी तालुक्यातील ओवारा गावातील परिस्थिती काही निराळीच आहे. या गावात येणाऱ्यांचे चिखलाने मस्त स्वागत होत असून निद्राधीन ग्रामपंचायत आणि निद्राधीन सदस्यांमुळे सर्वसामान्य जनतेला असह्य त्रास सहन करावा लागत आहे.

देवरी तालुक्यातील ओवारा गावात सर्वांचे स्वागत करण्यासाठी मोठे प्रवेश द्वार लावले असून याच ठिकाणी मोठे चिखल झाले असून पायी जाणारे , सायकल स्वार , दुचाकी स्वार चिखलामुळे जखमी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गावातील निद्रावस्थेत असलेले ग्रामपंचायत प्रशासन फक्त नावापुरतीच शिल्लक आहे हे स्पष्ट होते.

सरपंच सेवा महासंघाच्या नागपूर विभागीय कार्याध्यक्षपदी कमल येरणे यांची नियुक्ती

सविस्तर वृत्त असे कि ओवारा गाव परिसरातील बहू उद्देशीय प्रकल्पातून शेतात पाणी नेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी पाईप लाईन टाकली त्यासाठी त्यांनी मनमर्जी प्रमाणे खोदकाम केला आणि गावातील पक्क्या रस्त्याची चक्क वाट लावल्याचे आरोप नागरिक करीत आहेत. पाईप टाकले परंतु रस्त्यावर कुठलाही काँक्रेट किंवा मुरून न घालता काळी मातीने पाईप लाईन बुजविले त्यामुळे पावसाच्या पाण्याने या ठिकाणी मोठे चिखल साचले असून लोकांच्या समस्या वाढलेल्या आहेत.

प्रवेश द्वारावर हि स्थिती असल्यामुळे गावातील इतर सोयी सुविधाची काय परिस्थिती असेल याचा अंदाज कुणीही लावू शकतात. या ग्रामपंचायत कारणीभूत असलेल्या लोकांवर ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करावी आणि समस्या तात्काळ मार्गी लावावी अशी मागणी गावातील नागरिक रमेश बिसेन , गुणेश्वर पटले , अजित टेटे , खुमराज टेटे यांच्या सह इतर नागरिकांनी केली आहे.

कोट : लोकांच्या समस्या मार्गी लावण्यास सरपंच , सदस्य असमर्थ असल्यामुळे त्यांनी फक्त नावापुरते ग्राम पंचायत प्रशासनात न राहता लोकहिताचे कार्य करावे अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा- अजित टेटे (नागरिक )
कोट : लोकांनी पाईप लाईन केल्यामुळे नाली खोदली त्यावर सिमेंट काँक्रेट करायला सांगतले सरपंच – हिरामण टेकाम
Share