सरपंच सेवा महासंघाच्या नागपूर विभागीय कार्याध्यक्षपदी कमल येरणे यांची नियुक्ती

डॉ. सुजित टेटे
देवरी 5: सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेची वार्षिक सभा नुकतीच पार पडली असून या सभेमध्ये विविध मुद्यावर चर्चा करण्यात आली आणि नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

देवरी तालुक्यातील ओवारा गावाचे उपसरपंच कमल येरणे यांचे ग्रामीण भागातील विकासातील क्रांतिकारक सर्व गुण पाहता सरपंच सेवासंघात निस्वार्थ सेवा बघता राज्य कोअर कमिटीच्या निर्णयानुसार यांची नागपूर विभागीय कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.सरपंच उपसरपंच बांधवांना न्याय आणि संघटन मजबूत करण्यासाठी निस्वार्थ कामाची जबाबदारी कमल येरणे यांच्या कडे सोपविण्यात आलेली आहे.

यापूर्वी यांच्या कडे सरपंच सेवा महासंघाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष पद सोपविण्यात आलेले होते त्यांची जिल्हातील कार्यप्रणाली बघता विभागीय समितीमध्ये निवड करण्यात आलेली आहे.कमल येरणे यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हातील सर्व सरपंच उपसरपंच , मित्र परिवार आणि सहकार्यांनी अभिनंदन केलेले आहे.

Share