विधानसभेतील राड्याला जबाबदार १२ आमदार निलंबित, कोण आहेत ? वाचा साविस्तर
मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या आरक्षणासासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डाटा उपलब्ध करुन देण्याबाबतच्या ठरावाच्या निमित्ताने अध्यक्षांना अर्वाच्च भाषेत बोलणे, माईक ओढून घेणे, राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणे तसेच अध्यक्षांच्या दालनात शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे अशा प्रकारची वर्तवणुक केल्यासाठी जवळपास १२ आमदारांच्या निलंबनाचा ठराव विधानसभेत आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संमत करण्यात आला. एक वर्षांच्या कालावधीसाठी हे निलंबन करण्यात आले. संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मांडलेल्या ठरावाला विधानसभेत मंजुरी मिळाल्यानंतर तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांनी निलंबनाची घोषणा केली. या निलंबनाला एकतर्फी असल्याचा उल्लेख करत तसेच लोकशाहीचा खून करण्यात आल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सातत्याने विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारवर हल्ला करतो म्हणून विरोधी पक्षाचा नंबर कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही फडणवीस म्हणाल
कोणत्या १२ आमदारांचे निलंबन
१)संजय कुटे,२)आशिष शेलार,३)अभिमनूय पवार,४)गिरीश महाजन,५)हरीश पिंपळे,६)पराग अळवणी,७)हरीश पिंपळे,८)योगेश सागर,९)जयकुमार राव १०) तराम सातपुते,११)नारायण कुचे,१२)बंटी बागडिया