गडेगाव ग्रामपंचायत सदस्यांचे सामूहिक राजीनामे

मनमानी सरपंचाच्या कारभाराला कंटाळून उचलले पाऊल; प्रशासक नेमण्याची मागणी

भुपेंद्र मस्के

देवरी (जि.गोंदिया ): तालुक्यातील गडेगाव येथील सरपंच उपसरपंचासह सदस्याना विश्वासात न घेता मनमानी कारभार करु न एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत सात ग्रामपंचायत सदस्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहे.

 हे सर्व राजीनामे मंजूर करण्यात आले असून या सदस्यानी ग्रामपंचायत बरखास्त करु न प्रशासक नेमावा, अशी मागणी केली आहे.

कविता भिमराव वालदे सरपंच या उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्याना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप गेल्या काही महिन्यांपासून होत असून सदस्यांमध्ये धुसपुस होती. शासनाच्या विविध योजनाअंतर्गत गावात होत असणारी कामे सदस्यांना विश्वासात न घेता होत नसल्याचा आरोप या सदस्यांकडून होत होता.  ग्रामपंचायत सदस्य हतबल झाले होते. अखेर नऊ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या सात सदस्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचे ठरविले.

त्यानुसार ग्रामपंचायतची विशेष सभा दि.1जुलै आयोजित करण्यात आली होती.सरपंच कविता भिमराव वालदे  यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपसरपंच लिलाराम चैतराम मडावी, ग्रामपंचायत सदस्य हंसराज भोलाराम चंदमलागर,  श्रीराम रामसु कुंभरे, ईश्वरदास भगवानसिंग अरकरा, शशिकला शैलेस कुंभरे, सारिका महेंद्र पडोटी, चंद्रकला रामकृष्ण पडोटी   या सदस्यांनी आपले सामूहिक राजीनामे सरपंचाकडे सादर केले. हे सर्व राजीनामे या बैठकीत मंजूर करण्यात आले आहेत.

दरम्यान नऊ सदस्यांपैकी  सात सदस्यानी राजीनामे दिल्याने सदस्यसंख्या निम्याहून कमी झाली आहे.त्यामुळे ही ग्रामपंचायत बरखास्त करु न या ठिकाणी प्रशासक नेमावा,अशी मागणी या राजीनामा दिलेल्या सदस्यांनी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

तर सरपंच कविता भिमराव वालदे ह्या थेट जनतेतून निवडून आल्यामुळे तिथे प्रशासक बसवून कारभार चालतो कि सरपंचच 

 कारभार चालवतो याकडे गडेगाव वासियांचे लक्ष लागुन आहे.

1625473231839322-1

सदस्यांनी स्वेच्छेने राजिनामे दिल्यामुळे सदर राजिनामे मंजूर करण्यात आले.

– कविता भिमराव वालदे 

सरपंच, ग्रामपंचायत, गडेगाव.

मनमानी कारभाराला कंटाळून सातही सदस्यांनी राजिनामा दिला.

– हंसराज चंदनमलागर

ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच, ‌ग्रामपंचायत गडेगाव.

Print Friendly, PDF & Email
Share