टोकीओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना जिल्हाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा
गोंदिया 21 : टोकीओ ऑलिम्पिक-2021 मध्ये भारतीय 10 खेळाडूंची निवड झाल्याबद्दल आज 21 जुलै
रोजी नविन प्रशासकीय इमारत गोंदिया येथे 10 खेळाडूंच्या फ्लेक्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे हस्ते
करण्यात आले. यावेळी टोकीओ ऑलिम्पिक-2021 मध्ये जे खेळाडू भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत त्या सर्व
खेळाडूंना उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, जिल्हा
क्रिडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी कावेरी नाखले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार
हिवारे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढवे, कोषागार अधिकारी एल.एच.बाविस्कर, पोलीस निरीक्षक उध्दव
दमाळे, अप्पर तहसिलदार अनिल खडतकर, क्रीडा अधिकारी ए.बी.मरस्कोल्हे, तालुका क्रीडा अधिकारी राजेंद्र शिंदे
यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्रीमती गुंडे यावेळी म्हणाल्या, ऑलिम्पिक स्पर्धा हया जपान देशामध्ये टोकीओ या शहरामध्ये
23 जुलै ते 5 सप्टेंबर 2021 या कालावधीत संपन्न होणार आहेत. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून 10 खेळाडू व
संपूर्ण देशातून 228 खेळाडू व ऑफिशियलचे पथक टोकीओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मला आशा
आहे की, टोकीओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी उत्कृष्ट राहील व जास्तीत जास्त पदके भारताला प्राप्त
होतील. भारतीय खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी मी मनापासून व गोंदिया जिल्ह्याकडून खुप खुप शुभेच्छा देते
असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते सेल्फी पॉईंटचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. टोकीओ
ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आलेल्या खेळाडूंना पांढऱ्या फ्लेक्सवर स्वाक्षऱ्या करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
टोकीओ ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत. राही सरनोबत (पिस्तूल शुटींग 25
मीटर), चिराग शेट्टी (बॅडमिंटन पुरुष दुहेरी), तेजस्विनी सावंत (50 मीटर रायफल शुटींग), अविनाश साबळे
ॲथलेटिक्स 3000 मीटर), प्रविण जाधव (आर्चरी रिकर्व्ह) विष्णू सरवानन (सेलींग लेसर स्टँडर्ड क्लास), स्वरुप
उन्हाळकर (पॅरा शुटींग 10 मीटर रायफल), सुयश जाधव (पॅरा स्विमींग 50 मीटर बटर फ्लाय, 200 मीटर वैयक्तिक
मिडले), उदयन माने (गोल्फ), भाग्यश्री जाधव (पॅरा ॲथलेटिक्स) इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रीडा अधिकारी ए.बी.मरस्कोल्हे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा क्रीडा
अधिकारी घनश्याम राठोड यांनी मानले. कार्यक्रमास शिवछत्रपती अवार्ड प्राप्त राजेश राऊत, प्रशिक्षक नाजुक उईके,
विशाल ठाकुर, धनंजय भारसाकळे, दिपक सिक्का, मनिषा तराळे, विनेश फुंडे व जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे
व्हॉलीबॉल खेळाडू उपस्थित होते.