खासदार अशोक नेते यांची केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समितीच्या सदस्य पदी नियुक्ती

प्रतिनिधी / गडचिरोली : केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समितीची घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता मंत्री नारायण राणे यांनी नुकतीच केली. या समितीवर भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चा चे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यमिता सल्लागार समिती वर खासदार अशोक नेते यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. हे विशेष
त्यांच्या नियुक्तीबद्दल आमदार डॉ. होळी, आमदार कृष्णाजी गजबे, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, माजी आमदार संजयजी पुराम, माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम, भाजपचे जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ओबीसी मोर्चा चे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख बाबुरावजी कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे, प्रमोदजी पिपरे, गोविंदजी सारडा, गडचिरोली च्या नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिताताई भांडेकर, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जि. प सदस्य नानाभाऊ नाकाडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, जिप चे कृषी सभापती रमेशजी बारसागडे, जि. प च्या समाज कल्याण सभापती मीनाताई कोडाप, युवा मोर्चा चे प्रदेश सदस्य स्वप्नील वरघंटे, भाजयुमो चे जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये, तथा सर्व भाजपा पदाधिकाऱ्यांनी खास. अशोक नेते यांचे अभिनंदन केले आहे.

Share