देवरी पोलिसांचा रूट मार्च, बकरी ईद घरीच साजरी करण्याचे संदेश
देवरी 20: राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लावण्यात आलेले असल्यामुळे धार्मिक सण, सांस्कृतिक उपक्रम , जमावबंदी असल्यामुळे उदयाला 22जुलै ला मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातून पोलिस पथकाचा रूट मार्च काढून शांततेचा संदेश दिला.
याचप्रमाणे पोलीस स्टेशनच्या पटांगणात दंगा काबू करण्याची रंगीत तालीम घेतण्यात आली. शहरातून पोलिसांनी रूट मार्च काढून दुर्गा चौक, राणी दुर्गावती चौक, मेन रोड, पंचशील चौक आणि परत पोलीस ठाणे देवरी असे मार्गक्रमण केले.
सदर रूटमार्च मध्ये देवरीचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिगंनजूडे यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता राखून ईद सण साजरा करावा असा जनतेला संदेश दिला. सामाजिक अंतर, मास्कचा वापर , गर्दी न करता धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडावे असे सूचना यावेळी करण्यात आले.
या रुट मार्च करते वेळी देवरी पोलीस निरीक्षक रेवचंद सिगंनजुडे, API आनंदराव घाडगे, PSI नरेश उरकुडे, यांच्यासह देवरी पोलिस्टेसनचे पोलिस शिपाई व कर्मचारी उपस्थित होते. यामधे पोलीस दलाचे जवान सहभागी झाले होते.