राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचने अश्लील चित्रपटांशी संबंधित प्रकरणात शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्लिल फिल्म निर्मिती प्रकरणात पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राज कुंद्रा याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली होती.
राज कुंद्राला आज किला कोर्टात हजर करण्यात आले होते. फेब्रुवारी 2021 मध्ये क्राईम ब्रँचने अश्लील चित्रपट बनवणाऱ्यांवर तसेच विशिष्ट ऍप्लिकेशनवर ते अपलोड करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राज कुंद्रा हा प्रमुख आरोपी असल्याची बाब तपासात समोर आली. त्यानुसार सोमवारी रात्री अकराच्या सुमारास कुंद्राला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आल.
हा व्हिडिओ अपलोड करणार्या उमेश कामथलाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. 2021 फेब्रुवारीमध्ये मुंबईत गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट बनविण्याबद्दल आणि काही अॅप्सच्या माध्यमातून प्रकाशित केल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. याच्या तपासणीत राज कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. त्यानंतर या प्रकरणात सोमवारी रात्री कुंद्रा याला पोलिसांनी अटक केली. तसेच व्हिडिओ अपलोड करणाऱ्या उमेश कामथ यालाही पोलिसांनी अटक केली आहे.