आमगांव-देवरी रोडाचे काम तातडीने पूर्ण करुण लोकांना शुद्ध पानी उपलब्ध करुण द्या
आमदार कोरोटे यांचे प्रशासकीय, पानी पुरवठा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांना कड़क निर्देश
आमगांव/देवरी,ता.२०: आमगांव ते देवरी या महामार्गाचे रोड बांधकाम अनेक दिवसांपासून मंद गतीने सुरु आहे. त्यामुळे या महामार्गावरील बनगांव पानी पुरवठा योजने अंतर्गत ज्या ज्या गावात पानी पुरवठा सुरु आहे. त्या त्या गावतील पानी पुरवठा या रोडाच्या बांधकामामुळे खंडित पडले आहेत, त्यामुळे आमगांव परिसरातील ४७ गावातील लोकांना शुध्द पानी मिळत नाही.तरी या महामार्गावरील रोडाचे बांधकाम तातडीने पूर्ण करुण आमगांव परिसरातील लोकांना शुद्ध पानी त्वरित उपलब्ध करुण द्या असे कड़क निर्देश आमदार सहषराम कोरोटे यांनी आमगांव तहसील कार्यालयाचा सभागृहात सोमवारी(ता.१९ जुलै) रोजी आयोजित पानीपुरवठा विभागाच्या आढावा बैठकीत उपस्थित प्रशासकीय अधिकारी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व रोड बांधकामाचे कंत्राटदारासह संबंधित कंस्ट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधीली दिले.
हि आढावा बैठक आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बैठकीत आमगांव ते देवरी व त्याच बरोबर आमगांव रेल्वेस्टेशन ते छत्तीसगड राज्याच्या बाघनदी सिमेपर्यंत सुरु असलेल्या रोडाच्या बाँधकामामुळे बनगांव येथील पानी पुरवठा योजने अंतर्गत आमगांव परिसरातील एकूण ४७ गावांना पिण्याचे पानी पुरवनारी मुख्य पानी वितरक पाईपलाइन टाकन्यात आली आहे. ही पाईपलाइन या रोडाच्या खोदकामामुळे मागिल अनेक दिवसांपासून तुटलेली आहे. या बाबदाची दखल स्थानिक प्रशासकीय पातळीवर संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांनी घेतली नाही. या विषयाला आमदार कोरोटे यांनी गाम्भीर्याने घेवून या विषयावर विशेष आढावा बैठक घेतली आणि संबंधित यंत्रनेला या पानी पुरवठा योजनेची मुख्य पाईपलाइन पूर्वत करण्याचे कड़क दिशा निर्देश दिले.
या बैठकीत तात्काळ मुख्य पाईपलाइन चे काम संबंधित कंत्राटदार च्या कंपनी कडून करुण घेण्याची हमी ग्रामीण पुरवठा उपविभाग देवरीचे उपविभागीय अधिकारी यांनी दिल्याने आता. आठवड्याभरात या मार्गावरील मुख्य ठिकानापासुन तुटलेले मुख्य पाईपलाइन चे काम पूर्ण होणार असून आता आमगांव परिसरातील ४७ गावातील लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचे मार्ग कोकळे झाले आहे.
या प्रसंगीत बैठक आमगांव तालुका काँग्रेस चे अध्यक्ष संजय बहेकार, आमगांव चे तहसीलदार डी.एस.भोयर, सालेकसा चे तहसीलदार श्री.कांबळे, सालेकसा चे गटविकास अधिकारी श्री.मत्ते, गडचिरोली राष्ट्रीय महामार्गाचे उप अभियंता, कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पानी पुरवठा उपविभाग देवरीचे उपविभागीय अभियंता एस.एच.कटरे, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ एस.व्ही.पवार यांच्या सह एम.बी. पाटिल कंस्ट्रक्शन कंपनी व शिवालय कंपनी चे कंत्राटदार व प्रतिनिधि प्रामुख्याने उपस्थित होते.